शिलाखंडांचे ताम्रपट
शिलाखंडांचे ताम्रपट शिलाखंडांचे ताम्रपट! दोन दशकांपूर्वीची गोष्ट. लक्षवेधी मुंबईला जवळ असूनही काहीसे दुर्लक्षित असणाऱ्या पिरकोन गावाकडे काही संशोधकांची नजर वळली. आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या गावात इतिहास संशोधक कोण्या ‘ब्राम्हण’ कुटूंबियांची चौकशी करत होते. हा शोध पाहून सुरूवातीस सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांचा शोध ‘जोशी’ आडनावाच्या एका कुटूंबाकडे येऊन थांबला, परंतु गावातील जोशीसुद्धा आगरीच असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा लगतच्या आवरे गावाकडे वळवला. तिथेही तीच गत झाली. मुख्यत: आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या दोन्ही गावांत ‘ब्राम्हण’ कुटूंबीय शोधण्याची धडपड हे इतिहास संशोधक का करत आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या संशोधकांद्वारे हा सर्व शोध घेण्याचे कारण होते- ठाणे येथील उत्खननात सापडलेला एक ताम्रपट! हा ताम्रपट स्वच्छ झाल्याबरोबर यातील उल्लेखाने पिरकोन आणि आवरे ही दोन गावे ऐतिहासिक दृष्ट्या चमकू लागली. अनेक नविन संदर्भांचा उलगडा करणारा हा ताम्रपट संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. संशोधकांसाठी महत्त्वाचा दुवा असणारा ‘ताम्रपट’ म्हणजे काय आणि असतो तरी कसा? ...