Posts

शिलाखंडांचे ताम्रपट

Image
शिलाखंडांचे ताम्रपट शिलाखंडांचे ताम्रपट! दोन दशकांपूर्वीची गोष्ट. लक्षवेधी मुंबईला जवळ असूनही काहीसे दुर्लक्षित असणाऱ्या पिरकोन गावाकडे काही संशोधकांची नजर वळली. आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या गावात इतिहास संशोधक कोण्या ‘ब्राम्हण’ कुटूंबियांची चौकशी करत होते. हा शोध पाहून सुरूवातीस सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांचा शोध ‘जोशी’ आडनावाच्या एका कुटूंबाकडे येऊन थांबला, परंतु गावातील जोशीसुद्धा आगरीच असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा लगतच्या आवरे गावाकडे वळवला. तिथेही तीच गत झाली. मुख्यत: आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या दोन्ही गावांत ‘ब्राम्हण’ कुटूंबीय शोधण्याची धडपड हे इतिहास संशोधक का करत आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या संशोधकांद्वारे हा सर्व शोध घेण्याचे कारण होते-  ठाणे येथील उत्खननात सापडलेला एक ताम्रपट! हा ताम्रपट स्वच्छ झाल्याबरोबर यातील उल्लेखाने पिरकोन आणि आवरे ही दोन गावे ऐतिहासिक दृष्ट्या चमकू लागली. अनेक नविन संदर्भांचा उलगडा करणारा हा ताम्रपट संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. संशोधकांसाठी महत्त्वाचा दुवा असणारा ‘ताम्रपट’ म्हणजे काय आणि असतो तरी कसा? ...

लेखनसाहित्य

लेखनसाहित्य ज्यावर, वा ज्याच्या साहाय्याने लेखन केले जाते, अथवा कोरले जाऊ शकते, असे साहित्य वा सामग्री. लेखन हे केवळ विचारप्रकटनाचे साधन नसून भाषाप्रसाराचे माध्यम मानले जाते. लेखनासाठी प्राचीन काळापासून निरनिराळी माध्यमे वारपलेली आढळतात. प्रारंभी लेखन भूर्जपत्र, कातडी, शंख, मातीच्या विटा, कापड, प्रस्तर, लोखंड, कथिल, कासे, रुपे, सुवर्णपत्र, पितळ इत्यादींवर केले जाई. पुढे लेखणी, शाई यांच्या साहाय्याने कागदावर लेखन केले जाऊ लागले व मुद्रणकलेचा शोध लागून त्याचा प्रसार झाला. अशा लेखनावरून तत्कालीन साहित्याचा व विकासाचा आढावा घेता येतो. प्राचीन लेखनसाहित्यांत प्रस्तराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, याचे कारण त्याचे चिरस्थायित्व. धातू झिजतात; ऊन, वारा व पाऊस यांमुळे ते गंजतात. प्रस्तर गंजत नाहीत; धातूंच्या तुलनेत त्यांची झीज अत्यल्प असते. त्यामुळे प्राचीन कालीन प्रस्तराची लोकप्रिय लेखन साहित्यांत गणना करावी लागेल. दगडावर लेख लिहिण्यापूर्वी तो गुळगुळीत करण्यात येई. त्यावर काळ्या शाईने अगर खडूने मजकूर लिहीत. नंतर कोरक्या छणीने खोदून तो मजकूर पक्का केला जाई. अशा तऱ्हेने लेखरचना करणारा विद्वान, अक्षर...

ताम्रपट व नाणेशास्त्रात करिअर करण्यासाठी 'हा' अभ्यासक्रम महत्वाचा

  ताम्रपट व नाणेशास्त्रात करिअर करण्यासाठी 'हा' अभ्यासक्रम महत्वाचा  सकाळ वृत्तसेवा (यिनबझ) Saturday, 29 February 2020 भांडी, ताम्रपट किंवा  नाणी हा कालखंड ओळखण्याचा किंवा त्यावेळच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक पैलूंचा अभ्यास करण्याचा महत्वाचा पुरावा मानला जातो. उदाहरणार्थ भारतात सापडणारी विविध राजांनी पाडलेली नाणी, इंडो रोमन किंवा इंडो ग्रीक नाणी, अशोकाचे ताम्रपट या गोष्टी त्या त्या काळातील महत्वाचे पुरावे आहेत.  नाणेशास्त्र मुंबई विद्यापीठात नाणेशास्त्र व पुरातत्वशास्त्र या विषयात मास्टर्स चा विशेष अभ्यास उपलब्ध आहे. दिनेश मोदी संस्थान सरोज सदन, मुंबई विद्यपिठ कालिना, सांताक्रूझ भांडी, ताम्रपट किंवा  नाणी हा कालखंड ओळखण्याचा किंवा त्यावेळच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक पैलूंचा अभ्यास करण्याचा महत्वाचा पुरावा मानला जातो. उदाहरणार्थ भारतात सापडणारी विविध राजांनी पाडलेली नाणी, इंडो रोमन किंवा इंडो ग्रीक नाणी, अशोकाचे ताम्रपट या गोष्टी त्या त्या काळातील महत्वाचे पुरावे आहेत.  नाणेशास्त्र मुंबई विद्यापीठात नाणेशास्त्र व पुरातत्वशास्त्र या विषयात मास्टर्स चा विशे...

‘ताम्रपट’ आणि मराठा स्त्रिया

Image
‘ताम्रपट’ आणि मराठा स्त्रिया कादंबरीकार रंगनाथ पठारे आणि ‘ताम्रपट’चे मुखपृष्ठ Sat , 22 October 2016 संध्या शेलार  रंगनाथ पठारे  ताम्रपट  Sandhya Shelar Rangnatha Pathare  Tamrapat  मराठा स्त्रिया “सीताबाईचे वय ऐंशीच्या आसपास पोहचले होते. डोक्याचे सारे केस, पापण्या, भुवया सारे पांढरे झाले होते. चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या आणि हसली की राहिलेले उरलेसुरलेले निळसर पिवळे दात दिसत. ओठावर स्पष्ट जाणवण्याइतपत केस होते. तेही पांढरे झाले होते. केवढे प्रदीर्घ आयुष्य पाहिले, सोसले या स्त्रीने! दादासाहेबांच्या मनात आले, अगदी तरुण वयात ही विधवा झाली. पुढे सारे आयुष्य तिने असे एकाकी काढले. जवळचे कोणी राहिले नाही तरी ती राहिली. कुळीसाठी गंधर्व लावला नाही. नात्यातल्या साऱ्या मुलांना भाकरी बडवून घातल्या. हिने आयुष्याकडे काय मागितले असेल? कोणत्या आकांक्षा बाळगल्या असतील? कोणते श्रेय तिला मिळाले?”  ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या ‘ताम्रपट’ या साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या कादंबरीमध्ये जेमतेम चार ते पाच ठिकाणी सीताआजी या पात्राचा उल्लेख येतो. या एका पात्रातून पठारे यांन...

चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास!

Image
चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास! Submitted by  वरदा  on 11 May, 2015 - 12:00 उपोद्घात या शोधयात्रेच्या कहाणीची खरी सुरुवात झाली ती १९०६ च्या जुलै महिन्यात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे त्यांच्या अस्सल कागदपत्रे जमवायच्या मोहिमेत मजल दरमजल करत पोचले ते कोल्हापूरच्या उत्तरेला ४ मैलांवर असलेल्या एका छोट्याश्या गावंढ्या खेड्यात. त्याचं नाव होतं चिकुर्डे. कृष्णेच्या खोर्‍यात वारणा-मोरणेच्या संगमापासून जवळ असलेले हे गाव. त्या गावात धनगरांची मोठी वस्ती आजही आहे. त्यातल्या गावडे कुळातील एका बाईकडे असलेला ताम्रपट राजवाड्यांना पहायला मिळाला. त्यावेळेस त्याचा ठसा घेणे त्यांना शक्य झाले नाही, परंतु त्याचे वाचन करून तपशीलवार नोंद मात्र त्यांनी करून ठेवली व लगेचच १९०७ मध्ये विश्ववृत्त मधे या ताम्रपटाचे सटीक वाचन प्रकाशित केले. हा ताम्रपट कुण्या एका मन्नेय राम गावुंड या माहुताला जनमेजय चक्रवर्तिन नामक राजाने दिलेले गावांचे दान व मूलस्थानदेव नामक देवतेला दिलेली दाने नोंदवतो. भावसंवत्सरातील वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला हे दान दिले असा उल्लेख आहे. मात्र शकसंवताच...

प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट

Image
प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट (Pune Plates of the Prabhavatigupta) Post published:17/02/2020 वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडून हा ताम्रपट प्राप्त झाला. त्यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता. ताम्रपटात आलेल्या नामनिर्देशांवरून तो मूळतः सध्याच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील असावा, असा प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांचा कयास आहे. प्रभावतीगुप्ताचा पुणे येथील ताम्रपट. सदरील ताम्रपटाचे दोन पत्रे असून त्यांची लांबी २३ सेंमी. व रुंदी १४.४ सेंमी. आहे. दोन्ही पत्रे कडीमध्ये घातलेले असून त्या कडीवर मुद्रा आहे. मुद्रेचा आकार लंबवर्तुळाकार असून त्याची लांबी ७.२ सेंमी. व रुंदी ५.६ सेंमी. आहे. मुद्रेवर वरच्या भागात सूर्य व चंद्र आहेत. त्यानंतर चार ओळींच्या खाली एक फूल कोरलेले आहे. दोन्ही पत्र्यांच्या केवळ आतील भागावरच मजकूर लिहिला असून पहिल्या पत्र्यावर दहा व दुसऱ्यावर बारा ओळी आहेत. पहिल्या पत्र्यावरील अक्षरे ही दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांपेक्षा काहीशी मोठी आहेत. तसेच प्रत्येक अक्षराचा आकार ०.६२ सेंमी. आहे. दुसऱ्या पत्र्यावरी...

ताम्रपट

Image
ताम्रपट इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील सोघौरा येथील ताम्रपट ताम्रपट  हा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला मजकूर असतो. यावर प्रामुख्याने दानपत्रे आणि राजाज्ञा तसेच इतर दूरगामी आज्ञा कोरुन ठेवण्याची प्रथा दिसून येते. भारताला  स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने भारतीय क्रांतिकारकांना त्यांच्या बलिदानाच्या गौरवार्थ ताम्रपट दिले होते. ताम्रपटांवरील मराठी पुस्तके महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार (प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव)